Breaking News

 

 

छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त अरुण नरके फौंडेशनचे विविध उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अरुण नरके फौंडेशनने इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके यांचे व्य़ाखान आयोजीत केले होते. तसेच संस्थेच्या वतीने विविध उपक्रमही राबवण्यात आले. यामध्ये आज (मंगळवार) पन्हाळगड परीसराची स्वच्छता करण्यात आली.

अरुण नरके फौंडेशनने छ. संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इतिहासाचे अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्या व्य़ाखानाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी छ. संभाजी महाराजांची धाडसी वृत्ती आणि त्यांच्या शौर्याचे कथन केले.

आज पन्हाळगडावरील शिवमंदीरातील छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांच्या प्रतिमेस फौंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल, रविंद्र धडेल यांच्या हस्ते पुष्पहार वाहून पुजन करण्यात आले. चेतन नरके यांनी अरुण नरके फौंडेशनने गेल्या पंचवीस वर्षात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची माहिती दिली.

यावेळी पन्हाळगड परिसरात असणाऱ्या दोन ते तीन ट्रॉली प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन येथील परिसर स्वच्छ केला. यामध्ये संस्थेच्या सुमारे तीनशे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, समर कँम्प इचलकरंजी येथील लहान मुले, मुलींनी सहभाग घेतला होता. यावेळी पाणी वाचवा, झाडे लावा, प्रत्येक घरातून प्लॅस्टिक हटवूया, अशा घोषणा देत रॅलीही काढली.

यावेळी गडकोट संवर्धन अभ्यासक संदीप पाटील, सागर जाधव, प्रसाद कारेकरस, स्वप्नील यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

543 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा