Breaking News

 

 

महाराष्ट्राच्या वाट्याला मान्सूनची प्रतिक्षा : स्कायमेट

मुंबई (प्रतिनिधी) :  यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली. ४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात आले. यंदा ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे.

२२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ४ जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती स्कायमेटचे शास्त्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी दिली. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल, अशी माहितीही त्यांनी दिली.

351 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा