अत्याळमध्ये माजी विद्यार्थांनी केली प्राथमिक शाळेला मदत…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण फेडणे आपले कर्त्यव आहे अशी भावना ठेवून अत्याळ मधील सन १९९७-९८ सालच्या विद्यार्थांनी गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्रीत येऊन यांनी प्राथमिक शाळेला ५८ हजारांची मदत केली. ही मदत बँकेत ठेवून येणाऱ्या व्याजातून शाळेच्या गरजा भागवल्या जाणार आहेत.

गेटटुगेदर म्हणजे फक्त जुन्या आठवणी आणि एकत्रीत आल्यानंतर मौज-मजा ही आताची फॅशन झाली आहे.पण अत्याळ येथील या विद्यार्थानी ५८ हजाराची मदत करून गेटटूगेदरला एक वेगळे स्वरूप् देवून इतर विद्यार्थाच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. हे माजी विद्यार्थी वॉटस् अॅपच्या माध्यमातून एकत्रीत आले होते. त्यांनी आजारी वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि आई अंथरुणाला खिळलेल्या एका विद्यार्थिनीच्या नावावर २७ हजारांची यशवंत ठेव ठेवली होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणखी एका बॅचने सात हजाराची भर घातली होती.

यंदा प्राथमिक शाळेसाठी निधी जमवण्यास सुरवात झाली अन् काही दिवसातच ३८ हजार निधी जमा झाला आणि हा निधी शाळेच्या नावाने ठेव म्हणून ठेवण्यात आला. शासनाकडून पुरेसा निधी प्राथमिक शाळाना येत नाही. त्यामुळे माजी विद्यार्थांनी जमा केलेला निधी शाळेच्या कामी येतो. तर विद्यार्थांबरोबर निवृत शिक्षकांनी देखील स्नेहमेळाव्यात मुख्यधापक यांच्याकडे ठेव सुपुर्द केली. यावेळी माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

837 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram