वडील हयात असते तर त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते : रितेश देशमुख

मुंबई (प्रतिनिधी) :  केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी विलासरावांनी आपल्या मुलाला चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी यासाठी २६/११च्या हल्ल्याच्या वेळीही याच गोष्टीला महत्त्वं दिले होते. असे वक्तव्य केले होते. यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला अभिनेता रितेश देशमुख याने ट्विटद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या वडीलांनी कधीही चित्रपटांत मला भूमिका मिळाव्यात यासाठी कोणाकडे शिफारस केली नाही. त्यांनी कधीच कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाशी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला नाही आणि ते मी गर्वाने सांगत असल्याच ट्विट रितेशने केले आहे.

गोयल यांच्या वक्तव्याविषयी आपली तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत रितेशने लिहिले की, ‘हो, हे खरं आहे की मी ताज आणि ओबेरॉय या हॉटेलमध्ये गेलो होतो. पण तुम्ही आरोप केल्याप्रमाणे हे अजिबातच खरे नाही की गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले होतेवेळी मी त्या ठिकाणी होतो.  मी माझ्या वडिलांसोबत अनेक ठिकाणी गेलो. पण, हे अजिबात खरे नाही की त्यांनी कधीही चित्रपटांत मला भूमिका मिळाव्यात यासाठी कोणाकडे शिफारस केली होती.

एक मुख्यमंत्री म्हणून अमूक एका व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचरूच शकता. पण, स्वत:च्या बचावपक्षी उत्तर देण्यासाठी ती व्यक्ती हयातच नसेल तर त्यांच्या अनुपस्थितीत असे आरोप करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत रितेशने नाराजी व्यक्त केली. आता थोडा उशिर झाला आहे, सात वर्षांपूर्वी तुम्हाला त्यांनी याचं उत्तर दिले असते असे म्हणत रितेशने गोयल यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सदिच्छा दिल्या. 

648 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram