कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आंतरजातीय विवाह केलेल्या मेघा पाटील आणि इंद्रजीत कुलकर्णी यांचा ऑनर किलिंग झाले होते. काल (शनिवार) ऑनर किलिंग करणारे मेघाचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात कायदेशीर लढाईमध्ये योगदान देणारे वकील विवेक शुक्ल, साक्षीदार वंदना माधव, राहुल गुरव आणि पंच दिलदार मुजावर यांचा सत्कार आज संविधानाची प्रत आणि पुष्प देऊन करण्यात आला.

हा सत्कार आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. भगवान हिर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अनिल चव्हाण होते.

यावेळी डॉ. हिर्डेकर म्हणाले,  जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. माणसांचे कष्टाने मिळवले गुण महत्त्वाचे जातीपातीच्या खोट्या प्रति आपण प्रेमाने वाढवलेली मुलं-मुली यांचा बळी घेणे ही समाजामध्ये निषेधारक गोष्ट आहे. मेघा व इंद्रजीत यांच्या खून खटल्यामध्ये वकील, साक्षीदार आणि पंच हे फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार असल्याचे सांगितले.

कॉ. सतीश चंद्र कांबळे यांनी, आंतरधर्मीय विवाह परिषदेची माहिती देत  या परिषदेत आम्ही वीस जोडप्यांचा सत्कार केला, त्यात काही सवर्ण आणि दलित तर कांही हिंदू मुस्लिम विवाह केलेली जोडपी होती. त्या सर्वांचे संसार आजही उत्तम चालू असल्याचे सांगितले.

तर सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी, जुने विचार सोडून भारतीय घटनेने दिलेले आधुनिक विचार स्वीकारण्याचे सर्वांना आवाहन केले.

यावेळी, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, संजय सुळगावे, सीमा पाटील, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, संजय सुळगावे, रमेश वडणगेकर, सीमा पाटील, मारुती रेडेकर, विकास जाधव, गजानन विभुते, किरण गवळी आदी उपस्थित होते