धर्मवीर छ. संभाजीराजे जयंतीनिमित्त पालिकेची उद्यान स्वच्छता मोहिम…

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आज (मंगळवार) धर्मवीर छ.संभाजीराजे जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते ताराबाई उद्यान येथे करण्यात आला. निसर्ग व आरोग्य याचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी, असे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थितांना सांगितले.

या मोहिमेतंर्गत आज सकाळी ७ ते ८.३० पर्यंत महापालिकेच्या ताराबाई उद्यान येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये ताराबाई उद्यान तसेच बागे सभोवतालची स्वच्छता करण्यात आली. या माहिमेमध्ये महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला. तसेच ताराबाई उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित नागरीकांनी ताराबाई उद्यानांविषयी बाजू मांडून

यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबळे, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, संजय नागरगोजे, नारायण भोसले, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, विभागीय आरोग्य निरिक्षक, जेष्ठ नागरीक, महिला उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More