Breaking News

 

 

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

पनवेल (प्रतिनिधी) : नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे तीन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्याने पोलीस कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस शिपाई व नाईकांना सुमारे ८ ते ९ हजार रुपयांची वेतनात वाढ होणार आहे. तर, हवालदार ते सहा पोलीस उपनिरीक्षकांना १५ ते १८ हजार रुपयांची वाढ आणि पोलीस उपनिरीक्षकांनी १५ ते २० हजार रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने पोलीस व त्यांची कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

२०१६ सालापासून ही वेतनवाढ लागू करण्यात आली असून डिसेंबर २०१८ पर्यंतची वेतनवाढ ही भविष्यनिर्वाह निधी खात्यात प्रत्येक पोलिसाच्या जमा होणार आहे. यामध्ये पोलीस मुख्यालयात काम करणारे ८०० हून अधिक पोलिसांचे एप्रिल महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे आम्हाला कधी सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन मिळणार याच्या प्रतिक्षेत ८०० पोलीस आहेत.

सध्या या दलातील निम्याहून अधिक पोलिसांना मिळालेल्या वाढीव वेतनामुळे या दलात आनंद आहे. २००७ साली नवी मुंबई पोलीस दलात दाखल झालेले पोलीस शिपाई यांना मूळ वेतन ३ हजार रुपये दिले जात होते. त्यानंतर या शिपाईंची पदोन्नती झाली. त्यांना मार्च २०१९ पर्यंत १२ हजार मूळ वेतन होते. इतर भत्ते धरून या पोलीस नाईक यांना सुमारे ३१ हजार एकूण वेतन मिळत होते.

1,170 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग