अभिनेते कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी…

मुंबई (प्रतिनिधी) :  नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केले होते. त्यानंतर आता कमल हसन यांना अखिल भारतीय हिंदू महासभेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

कमल हसन यांच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप-शिवसेनेकडून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.  दरम्यान, नथुराम गोडसे याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा खून केला आहे. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येतो. याआधी अनेकांनी हा आरोप केलेला आहे.

180 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram