सलग ९ व्या दिवशी शेअरबाजार कोसळला : गुंतवणूकदारांचे अब्जावधींंचे नुकसान

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारात आज (सोमवार) सलग नवव्या दिवशी घसरण झाली. आयटीसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, मारुती, स्टेट बँकेच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली.  सेन्सेक्समध्ये ३७२.१७ अंकांची घसरण होऊन तो ३७०९०. ८२ वर बंद झालाय. निफ्टी १३०.७० अंकांनी खाली येऊन ११,१४८.२० वर बंद झाला. लागोपाठ ९ व्या दिवशी बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे ८.५६ लाख कोटी रुपये बुडाले.

आज टाटा स्टिल, यस बँक, आयशर मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टिल, इंडसइंड बँक आणि सन फार्मा हे शेअर्स जास्त घसरलेत. भारती इंफ्राटेल आणि टायटन यांचे शेअर्स वधारले. लागोपाठ 9 व्या दिवशी बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे ८.५६ लाख कोटी रुपये बुडाले. आजच्या कारभारात निफ्टीचे इंडेक्स आयटी सोडून सर्व सेक्टरोल इंडेक्स लाल निशाणीवर बंद झाले. पीएसयू बँक आणि फार्मा शेअर्स यांची जोरदार घसरण झालीय. शिवाय तेल गॅल, मेटल आणि पॉवर इंडेक्स यातही २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.

138 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram