Breaking News

 

 

छ. शाहू समाधीस्थळासाठी सर्वांनी सहकार्य करावे : महापौर

कोल्हापूर (प्रतिनिधी)  नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळाचे काम पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ.सरीता मोरे यांनी आज (सोमवार) केले. स्मारकाचे काम पुर्ण होण्याच्या दृष्टीने बोलावलेल्या बैठकीत त्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या.

महापौर मोरे म्हणाल्या, महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये सुसज्य व्यायाम शाळा साकरण्यात येईल. तसेच राजर्षी शाहू समाधी स्थळ नर्सरी बाग सिध्दार्थनगर असे नाव देण्यात येईल. आणि तेथील सभागृहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नांव कायम असेल.   

या स्मारकाला अनेक संघटनांनी विरोध करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. या राजाने जगाला आपली संपत्ती दिली. त्या राजाचे समाधी स्मारकासाठी महापालिकेने निधी दिला आहे. शासनाकडून निधी मिळत नाही. सिद्धार्थ नगर येथे हे समाधीस्थळ होत असल्याने या भागाचे नाव होणार आहे. शाहू समाधी स्थळाची विटंबना होत असेल तर ती खेदाची बाब आहे, असे उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले.  

समिती सदस्यांच्या निवेदनानंतर ही बैठक बोलावली आहे. छ. शाहू राजांच्या विचारांनीच प्रवृत्त होवून काम करीत आहोत. चर्चेतुन मार्ग काढू राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मारक आहे. संरक्षणाची गरज असल्याचे आयुक्त डॉ. एम.एस.कलशेट्टी यांनी सांगितले.

नर्सरी बागेत साकारण्यात येणारे समाधी स्थळ हे ऐतिहासिक ठिकाण होत आहे. या ठिकाणी छ.शिवाजी महाराज, छ.ताराराणी यांची मंदीरे आहेत तर लागूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे सभागृह आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध होते. त्यामुळे त्यांच्याही जीवन कार्यावर प्रकाश टाकला जाईल व हे सर्वच बाबतीत एक ऐतिहासिक स्मारक होईल, यासाठी प्रयत्न करावेत. असे समिती सदस्य वसंत मुळीक यांनी सांगितले.

वसंत लिंगनूरकर यांनी समाधी स्थळाच्या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांचा बंदोबस्त येथील नागरीक करतील. विनाकारण गैरसमज पसरू नयेत, प्रवेशद्वाराची मागणी मान्य करावी, असे वसंत लिंगनूरकर यांनी सांगितले

महासभेत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे माजी नगरसेवक अदिल फरास यांनी सांगितले. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची समाधी स्थळाचे काम पुर्ण होण्यासाठी सिध्दार्थनगर वासियांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. मागण्यांचा विचार होईलच परंतू स्मारक होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, आर्किटेक्चर व्ही.के.पाटील, सिध्दार्थनगर मधील रहिवासी आदी उपस्थित होते.

210 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे