Breaking News

 

 

राजस्थानचा मंत्री म्हणतो, ‘सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान ?

जयपूर (वृत्तसंस्था) : काँग्रेसकडून स्वा. सावरकर यांचा केला जाणारा अनादर, द्वेष काही नवा नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वी त्यांच्याविषयी अश्लाघ्य उद्गार काढून आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारा प्रचंड आदर (?) व्यक्त केला होता. राजस्थानमध्ये काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेसप्रणीत अशोक गेहलोत सरकारने तीच री ओढली आहे. शिक्षणमंत्र्याने तर आपल्या अकलेचे तारे तोडताना सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेच योगदान नसल्याचा जावईशोध लावला आहे.

भाजप सरकारच्या काळात विस्ताराने आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धड्याला नव्याने सत्तेत आलेल्या गेहलोत सरकारने कात्री लावली आहे.  याबद्दल राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी स्पष्टीकरण देताना सावरकरांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतंच योगदान नाही. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आधीच्या सरकारने केलेल्या या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी समिती गठित केली होती. आता जे पाठ्यपुस्तकात आहे ते ठोस पुराव्यांवर आधारित आहे.’

राजस्थानात ज्या विचारधारेचं सरकार येतं, तसे बदल तेथील पाठ्यपुस्तकातल्या इतिहासात होत जातात. राजस्थानातील यापूर्वीच्या सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा अंश हटवला होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या वीर सावरकरांविषयी विस्तृत लिहिले होते.  यातील राजकारणाचा भाग वगळता दोन्ही पक्षांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नेत्यांविषयी कोणतीही टीका-टिप्पणी करणे योग्य नाही, असा सूर जनतेतून उमटत आहे.

246 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा