Breaking News

 

 

आचारसंहितेनंतर छ. संभाजी महाराज स्मारकाचे काम सुरु : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पापाची तिकटी परिसरात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत आज (सोमवार) महापौर सौ.सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छ.ताराराणी सभागृहात बैठक झाली. या स्मारकावरुन राजकारण उफाळले असून हिंदुत्ववादी कार्यकर्ते, आ. राजेश क्षीरसागर आणि आ. सतेज पाटील यांच्यात श्रेयवादावरुन जुंपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या स्मारकासाठी आराखडा तयार केला असून त्याला मान्यता द्यावी, असे आवाहन शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी केले. या स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आर्किटेक्चर रणजित निकम यांनी सभागृहात केले.

महापालिकेने या कामासाठी वीस लाखांची तरतुद केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरु होईल. स्मारकाचे डिझाईन सर्वांनी मान्य करावे. उर्वरीत निधी माझ्या फंडातून देऊ, असे आ. राजेश क्षीरसागर यांनी बैठकीत सांगितले. आर्किटेक्चर यांनी दोन ते तीन प्रकारचे डिझाईन तयार करुन सर्वांना दाखवावे. सर्वांना ते मान्य असल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

पापाची तिकटी येथे महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. या दोन्ही पुतळयाचे सुशोभिकरण एकत्रिक करता येईल का. तसेच संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती सारंगधर देशमुख यांनी केली. र्ण करुन दोन्ही बाजू संरक्षित करता येतील. आ. सतेज पाटील यांनी 30 लाख रुपये निधी देण्याचे मान्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा आराखडामध्ये मी स्व:ता लक्ष घालून आचारसहिता संपल्या नंतर त्वरीत निविदा मागवून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात येईल, असे आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

समाधी स्थळाच्या कामात कोणीही अडचण आणू नये. तसेच सर्व समावेशक समितीसाठी आपले मार्फत एका सदस्याचे नांव महापालिकेकडे द्यावे, असे महापौर सौ.सरीता मोरे यांनी सांगितले.

बैठकीला परिवहन समिती सभापती अभिजीत चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, गटनेता नियाज खान, नगरसेविका सौ.हसिना फरास, नगसेवक ईश्वर परमार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, माजी नगरसेवक अदिल फरास, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व निमंत्रीत सदस्य आदी उपस्थित होते.

444 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश