Breaking News

 

 

आरक्षणाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे आहेत कुठे ? : राज ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातल्या मुलामुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारने  फसवणूक केली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केली.

आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे ? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जाते असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, जे चुकीचं सुरू आहे त्याबाबत बोललं गेलंच पाहिजे. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

324 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा