मतांसाठीच मोदींकडून बलात्काराच्या मुद्द्याचा वापर : मायावती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पिडीतेशी कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत असल्याची टीका मायावती यांनी आज (सोमवार) एका जाहीर पत्रकार परिषदेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राजस्थानच्या अलवरमध्ये महिलेवरील सामुहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मायावती म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर राजकारण करू नये. आधी देशातल्या दलितांवरील अत्याचारांबाबत जबाबदारी घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

96 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram