Breaking News

 

 

पाकिस्तानला ‘नाणेनिधी’कडून ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज…

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी ‘आयएमएफ’ने ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘आयएमएफ’ तीन वर्षांमध्ये पाकिस्तानला हे ‘बेलआऊट पॅकेज’ देणार असून याला संचालक मंडळाची मंजुरी मिळाली नसल्याचेही सांगण्यात आले.

सद्यस्थितीत पाकिस्तानची व्यापारी तूट २० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात ५० टक्क्यांची घट झाल्याची माहिती पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार डॉ. अब्दुल हफिज शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, पाकिस्तानी सरकारने महागाई, कर्जाचा बोजा आणि धीम्या गतीने वाढणारा विकास दर अशा समस्यांशी सामना करण्यासाठी बेलाऊट पॅकेजची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा स्वीकार केल्याची माहिती ‘आयएमएफ’कडून देण्यात आली. पण याला संचालक मंडळाची मंडळाची मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

273 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा