Breaking News

 

 

छत्तीसगड सरकारकडून पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक…

दंतेवाडा (वृत्तसंस्था) : नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापर केला जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने दंतेश्वरी लडाके  नावाचे पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक तयार केले आहे. येथील नक्षलग्रस्त बस्तर आणि दंतेवाडा भागात हे पथक तैनात करण्यात आले आहे.

या पथकात ३० नक्षलविरोधी महिला कमांडो आहेत. यामध्ये १० अशा महिला आहेत ज्यांनी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना या नक्षलविरोधी पथकात अधिकृतरित्या समावून घेण्यात आले आहे.

बस्तरचे पोलीस महानिरिक्षक विवेकानंद सिन्हा म्हणाले, दंतेश्वरी लडाके पथक हे महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण आहे. महिला पोलीस कमांडो पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या उत्कृष्ट पद्धतीने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

देशातील नक्षलवादाविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. नुकतेच छत्तीसगड पोलिसांनी पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डमध्येही महिला कमांडो तैनात केले आहेत. हे कमांडो नक्षलविरोधी कारवायांसाठीचे सर्वात पुढे असणारे पथक आहे. या पथकातही ३० महिलांचा समावेश असून पोलीस उपाधिक्षक दिनेश्वरी नाद यांच्या नेतृत्वाखाली ते तयार करण्यात आले आहे.

153 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा