Breaking News

 

 

मला ओरडणारी ‘ही’ एकमेव व्यक्ती : नरेंद्र मोदी

इंदौर (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या अध्यक्षासुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे. भाजपामध्ये केवळ महाजनच अशा आहेत ज्या मला ओरडू शकतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदौर येथे बोलत होते.

मोदी म्हणाले की, लोकसभा स्पीकर म्हणून ताईंनी कुशलता आणि संयमीपणे काम सांभाळले. त्यामुळे त्यांनी सर्वांवर स्वत:ची अशी छाप टाकली आहे. सर्वजण मला पंतप्रधान म्हणून ओळखता पण पार्टीत मला कोणी ओरडू शकत असेल तर त्या ताई आहेत.

मी आणि ताईंनी भाजपा संघटनेचे कार्य केले आहे. त्यामुळे कार्याप्रती त्यांचे समर्पण मी पाहिले आहे. त्यामुळे इंदौरच्या विकासातील ताईंचे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सुमित्रा महाजन इंदौरच्या जागेहून १९८९ ते २०१४ दरम्यान सलग आठ वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. आता भाजपाचे स्थानिक नेते शंकल लालवानी यांना महाजन यांचे उत्तराधिकारी बनवून इंदौरमधून उमेदवारी देण्यात आली.

इंदौर विकास प्राधीकरण (आईडी) चे चेअरमन आणि इंदौर नंगर निगमचे सभापती राहिलेले लालवानी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी लालवानी आणि काँग्रेस उमेदवार पंकज संघवी यांच्यात लढत होणार आहे.

300 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे