Breaking News

 

 

नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता आणि तो म्हणजे नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधी यांना मारलं होतं, असे खळबळजनक विधान मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी केले आहे. त्यांनी अरवाकुरीची येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. 

कमल हसन म्हणाले की, ‘प्रचार करत असताना या संपूर्ण भागात मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने आपण हे विधान करतोय असं आपल्याला वाटेल पण तसं नाही. यापुर्वीही आपण हेच विचार व्यक्त केले होते. सभ्य भारतीयांना तिरंग्याचा अभिमान आहे शिवाय त्यांना देशात समानताही हवी आहे. त्याच समानतेचे आपणही पुरस्कर्ते असल्याचे यावेळी ते म्हणाले.

राजकीय वर्तुळात सक्रिय असणाऱ्या कमल हसन यांनी २१ फेब्रुवारी २०१८ ला मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली होती. निवडणुकांच्या रिंगणात त्यांचा हा पक्ष राजकीय पटलावर सक्रिय झाला आहे. तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये येणाऱ्या एका नव्या युगासाठी एक महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचा निर्धार त्यांच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता खरंच त्या अनुशंगाने हसन यांचा पक्ष काम करतो, का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

264 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग