विंग कमांडर अभिनंदन यांची सूरतगडमध्ये पोस्टिंग

0 1

जयपूर (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचे एफ -१६ फायटर विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची राजस्थानमधील सूरतगडच्या एअर फोर्स तळावर पोस्टिंग करण्यात आली आहे. हवाई दलाच्या वैमानिकांच्या पोस्टिंगचा विषय गोपनीय असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

अभिनंदन कॉकपीटमध्ये परतणार की, नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही. विंग कमांडर यांच्या प्रकरणाकडे थो़डया वेगळया अंगाने पाहिले जाऊ शकते असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातून परतल्यानंतर अभिनंदन यांची ही पहिली पोस्टिंग आहे.

सध्या अभिनंदन सूरतगड एअर फोर्स तळावर रुजू झाले आहेत. अभिनंदन यांची राजस्थानमध्ये पोस्टिंगची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ते बिकानेरमध्ये तैनात होते. अभिनंदन यांचे वडिलही हवाई दलात होते. वडिलांची पोस्टिंग राजस्थानमध्ये असताना अभिनंदन यांनी त्यांचे शिक्षण राजस्थानमध्ये घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More