Breaking News

 

 

काही ठिकाणी कमळाऐवजी घड्याळाला मतदान : रामदास आठवले

सोलापूर (प्रतिनिधी) : शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी पण सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी (भाजपा) राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झाले आहे. ईव्हीएम मशीन या काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशीन खराब असू शकत नाहीत, असा टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला. ते सोलापूर येथील दुष्काळ दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले की, घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचे मी डोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळे मला ईव्हीएम मशीनबाबत चिंता वाटते, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते असे म्हणाले.

फडणवीस सरकार अनुभवी नसेल तर त्यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. शरद पवार हे अनुभवी आहेत. त्यांच्या सरकारने खूप कामे केली, मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा ? असा सवाल आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

396 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *