Breaking News

 

 

चंद्रकांतदादांनी राज्यात फिरून दुष्काळाची पाहणी करावी : शरद पवार

सातारा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेतात. फोनवरून कोणीही माहिती घेवू शकते, मात्र सरकारने राज्यभरात फिरून परिस्थिती समजून घ्यायला हवी. तर चंद्रकांतदादांनी मुंबईत बसून आव्हान देण्यापेक्षा राज्यातील दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. मात्र, काहीजण राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. दुष्काळा संदर्भात सरकारने राबवलेल्या कामांची यादी आपण कोणालाही द्यायला  तयार आहोत. त्यामुळे मुंबईत बसून आव्हान देण्यापेक्षा राज्यातील दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी, तेव्हाचं खरी परिस्थिती कळेल, असे टोलाही महसूलमंत्री चंद्रकांतदादांना लगावला.

गावांमध्ये पिण्याचे पाणी, चारा छावण्यासाठी अनेक नियम लावण्यात आले आहेत. तसेच आपण छोट्या लोकांच्या आव्हानाकडे लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

165 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे