Breaking News

 

 

इसिसचा भारतात शाखा उघडल्याचा दावा…

श्रीनगर (वृत्तसंस्था) :  दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसिस) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला आहे. १० मे रोजी दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर इसिसने यासंदर्भात घोषणा केली. इसिसची नवी शाखा ‘विलायाह ऑफ हिंद’   दहशतवादी संघटन असे ठेवण्यात आले आहे. परंतु जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

एसआयटीई इंटेल ग्रुपच्या रिटा काट्ज यांनी इसिसच्या बोलण्यात काही तथ्य नाही पण त्यांचे बोलणे गांभीर्याने घ्यायला पाहिजे असल्याचे सांगितले. इसिसने शाखेच्या भौगोलिक नियंत्रण विस्ताराबद्दल काही माहिती दिली नाही. पश्चिम आशियातील आपली जागा घालवल्यानंतर इसिस जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारतात येणे हे त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. याचा उल्लेख इसिसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने केला होता. 

काश्मीरच्या सोपिंया जिल्ह्यात हत्यारधारी इसिसचे दहशतवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे इसिसने टेलीग्राम अॅपवर सांगितले.

243 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा