Breaking News

 

 

भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही : प्रियांका गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना खूप त्रास दिलाय. लोकांनीही खूप सहन केलंय. त्यामुळे देशाची लोकशाही वाचवणं महत्त्वाचं असून त्यासाठीच ही लढाई लढली जात आहे. तर भाजपचं सरकार सत्तेतून जात आहे, असं काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज (रविवार) सांगितले. त्या लोदी इस्टेट इथे मतदानावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या, मोदींनी १५ लाख रुपये आणि रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर ते आता बोलत सुद्धा नाहीत. या मुद्दयावर बोलायचं सोडून ते भलत्याच विषयावर बोलत आहेत. असं सांगत यावेळी भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

219 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे