Breaking News

 

 

माझे भाषण म्हणजे अँटी डोस : योगी आदित्यनाथ

वाराणसी (वृत्तसंस्था) :  लोकसभा निवडणूकीसाठी आज (रविवार) सहाव्या टप्प्यासाठीचे मतदान सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. स्वत:ला अपघाती हिंदू म्हणवणारे आता मंदिरांच्या फेऱ्या मारत असल्याचे ते म्हणाले. तसेच माझे भाषण हे एक अॅंटी डोस असून ते वेळोवेळी द्यायला लागते, हे खूप गरजेचे असते असेही ते म्हणाले.   

योगी आदित्यनाथ म्हणाले, अली, बजरंग बली आणि सैन्या संदर्भात जी भाषणे मी केली, ती वेळेची गरज होती असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या व्हायरसला अॅंटी डोस देऊन दोन वर्षात संपवले आहे. अमेठी आणि रायबरेली हे मागास शहरात आहे. देशात पहिल्यांदाच जनता उमेदवाराबद्दल विचारत नाही. पंतप्रधान मोदींनी जातीवादाचे राजकारण विकासाशी जोडल्याचे ते म्हणाले. 

तर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याचे राजकारण करत आहोत. इतकी मतं मिळाल्यानंतर ७४ हून अधिक जागा आम्ही युपीत जिंकू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्यावेळी केवळ पंतप्रधान मोदी यांचे नाव होते, यावेळी माझे नाव देखील असल्याचे ते म्हणाले. 

288 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग