कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर सामायिक प्रवेश परीक्षा-२०२३ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी दि. २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवापूर्व केंद्राच्या संचालक डॉ. लता जाधव यांनी केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सन २०२३ करिता पूर्ववेळ प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांच्यासह यशदा, पुणे व पीसीएमसी, पुणे केंद्रामध्ये विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. याबाबतची सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबधी इतर सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दि. २५ नोव्हेंबर असून, प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. लता जाधव यांनी केले आहे.