Breaking News

 

 

म्हणूनच मी मोदींना आलिंगन दिले ! : राहुल गांधी

भोपाळ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या आजीबद्दल प्रचंड द्वेष आणि तिरस्कार आहे. त्याचमुळे ते माझ्यावर शाब्दिक हल्ला करतात. माझ्या वडिलांवर, आजीवर टीका करतात. त्यांच्याबद्दलही तिरस्कार पसरवतात. मला मोदींच्या मनातून हा द्वेष आणि तिरस्कार संपवायचा आहे. म्हणूनच मी त्यांना प्रेमाने आलिंगन दिलं होतं, असे म्हणत राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ते मध्यप्रदेशातल्या शुजलपूर येथील सभेत बोलत होते.

अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलिंगन दिलं होतं त्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यावर आज राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकांचे अखेरचे दोन टप्पे पार पडणं बाकी आहे. १९८४ च्या शीख विरोधी दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातून आले होते असा आरोप मोदींनी केला. तसेच राजीव गांधी हे भ्रष्टाचारी नंबर वन होते. मिस्टर क्लीन असे बिरूद मिरवणाऱ्या तुमच्या वडिलांची कारकीर्द भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून संपली अशी टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर केली होती. याच सगळ्या आरोपांना राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचा द्वेष करतात, तिरस्कार करतात मी मात्र त्यांना झप्पी दिली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपा नेते काही भाष्य करतात का,  हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

366 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash