मुंबई (प्रतिनिधी) :  सध्या अनेक ठिकाणी तस्करी आणि चोरीच्या प्रकरणांच्या बातम्या आपण ऐकत असतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या घटना कायम ऐकायला मिळातात. कधी मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या म्हणून तर कधी दागिने चोरी गेल्याच्या बातम्या आपण ऐकतो. सध्या असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारात चोऱ्या मोठमोठ्या गोष्टींची तस्करी केली आहे. ही घटना जेएनपीटी बंदरात घडली आहे. या प्रकाराने आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. उरण जेएनपीटी बंदरात तस्करीचे प्रमाण वाढत चाललेय. न्हावा शेवा सीमा शुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणी मोहिमेत तीन कोटींचे ३२ मेट्रिन टन नेकट्रराईनसह दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह, मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट सारख्या प्रमुख चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे जप्त करण्यात आलीत. सध्या असे प्रकारही भारतात अनेकदा घडताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या दागिने मौल्यवान गोष्टींच्या सुरक्षितेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या यावर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे.