भाऊसिंगजी रोडवरील मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा निघाला दिव्यांग बालक ! : लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : येथील भाऊसिंगजी रोडवरील योगीराज कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीमध्ये रोख रकमेसह मोबाईल हँडसेटची झालेली चोरी एका दिव्यांग अल्पवयीन बालकाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बालकास अटक करून त्याचेकडून ७२ हजार रुपये रोख आणि चोरी केलेले हँडसेट जप्त केले असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि. वसंत बाबर यांनी दिली.

बाबर म्हणाले की, या मोबाईल शॉपीच्या पोटमाळ्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरी झाल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा चोरटा रस्त्यावरून जाताना पाय ओढत चालत असल्याचे दिसून आले. यानुसार शोध घेताना महानगरपालिकेनजीक अशा प्रकारे चालणारा मुलगा आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने योगीराज शॉपीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आणि चोरीतील रक्कम रु. ७२ हजार ५o आणि ६ मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा १ लाख ९ हजार २५० रुपयाचा माल आपल्या घरातील तिसऱ्या माळ्यावरील खोली ठेवलेला काढून दिला. अवघ्या ४८ तासात या चोरीचा छडा लावण्यासाठी त्या परिसरातील सीसीटिव्हीचा उपयोग झाल्याचे बाबर यांनी सांगितले

या बालकाने प्रथमच केलेला चोरीचा प्रयत्न सराईताप्रमाणे केला, पण सीसीटीव्हीने त्याचा घात केला. त्याचे वडील हयात नाहीत तर आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. आईच्या परोक्ष त्याने चोरीचा उद्योग केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

252 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram