Breaking News

 

 

ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक यांचे निधन

इस्लामपूर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक यांचे आज (शनिवार) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सांगली – कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ते कनिष्ठ बंधू तर आ. अमल महाडिक, खा. धनंजय महाडिक यांचे ते चुलते होत.

आज दुपारी दीडच्या सुमारास त्यांना स्नानगृहात त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला. कुटुंबियांनी दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढत तातडीने इस्लामपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र उपचार सुरु असतानाच नानासाहेब महाडिक यांचे निधन झाले. पेठसह वाळवे तालुक्‍यात त्यांचा दांडगा लोकसंपर्क असून त्यांच्या निधनाचे वृत्त समाज्ताचे त्यांच्या पेठ येथील निवासस्थानाकडे लोकांची रीघ लागली आहे.

6,937 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे