मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती; मात्र आज १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळू नये असे ईडीने म्हटले होते; मात्र आज संजय राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पीएमएलए  कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. इतके दिवस ते ऑर्थर रोड तुरुंगात होते. दुसरीकडे ईडीने राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.  

महाराष्ट्रातले राजकीय वातावरण तापलेले आहे. एकीकडे शिवसेना दुभंगली आहे. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना रोज रंगतो आहे. अशा सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. ३१ जुलैला संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती.

२ लाखांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत आणि त्यांचा भाऊ प्रवीण राऊत या दोघांनाही . पीएमएलए कोर्टाने पत्राचाळ घोटाळ्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. अंधेरीची पोटनिवडणूक, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी घडल्या. आता या सगळ्या नंतर संजय राऊत यांचे बाहेर येणे महत्त्वाचे मानले जात आहे. संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते की, ‘मी काहीही झाले तरी झुकणार नाही’ असे म्हटले होते. ते शेवटपर्यंत लढले. आज त्यांच्या भूमिकेचा विजय झाला. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो आहे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.