Breaking News

 

 

वायुसेनेची ताकद वाढली ! : अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा ताफ्यात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायुसेना अधिकाधिक ताकदवान बनवत असून यात आता लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे गार्डियनचा समावेश झाला आहे. हे जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टर्सपैकी एक मानले जाते. भारताने अमेरिकेशी अशा २२ लढाऊ हेलिकॉप्टरचा करार केला आहे. बोइंग एएच-६४ अपाचे हे जगातील सर्वात घातक हेलिकॉप्टर मानले जाते. गेल्या वर्षी अमेरिकेने भारतीय वायु सेनेला सहा एएच-६३ ई हेलिकॉप्टर देण्याच्या करारावर सह्या केल्या. हे हेलिकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

बोईंग निर्मित पहिले ‘अपाची’ हे लढाऊ हेलिकॉप्टर (एएच-६४ इ (I) Apache Guardian ) भारतीय वायू दलाकडे आज (शनिवार) अमेरिकेत अरिझोना इथे सुपूर्त करण्यात आले. जुलै महिन्यात ‘अपाची’ हे भारतात समारंभाद्वारे वायू दलात दाखल होईल. या वर्षी ९ तर 2020 च्या अखेरीस उर्वरित १३ अपाचे हेलिकॉप्टर वायू दलात दाखल होणार आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर किमान ४२ फायटर स्क्वाड्रनची गरज असताना ही ताकद कमी करुन ३१ करण्यात आली आहे. पर्वत आणि जंगलांमध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हेलिकॉप्टरची खूप मदत होणार आहे. 

भारतीय वायुसेनेकडे सध्या असलेली हेलिकॉप्टर्स तीन दशकाहुनही अधिक जुनी आहेत. अपाचेच्या समावेशाने भारतीय वायुसेनेची ताकद वाढली आहे. अपाचे हे रॉकेट, टॅंकवर निशाणा साधणारे मिसाइल आणि जमिनीवरील विरोधकावर हल्ला करण्यास सक्षम असते. यामध्ये दोन क्रू मेंबर असतात. तसेच हे कोणत्याही हवामानात हल्ला करु शकते. हे हेलिकॉप्टर इस्त्रायल, इजिप्त आणि हॉलंड यांच्याकडे देखील असून ते अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज आहे. 

162 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे