Breaking News

 

 

धक्कादायक : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वाघांची कत्तल

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात विस्तारलेल्या सातपुडा पर्वतराजीमधील वाघांची संख्या अचानक झपाट्याने कमी होत आहे. पैशांचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेतून गावकरीच या वाघांची कत्तल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक कामात वनकर्मचारीही व्यग्र असल्याने गावकऱ्यांचे चांगले फावले असून वाघांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात ते घुसखोरी करून वाघांना ठार करत आहेत

अभयारण्याचे प्रमुख सेऊनी यांनी सांगितले की, जंगल परिसरात दोन मोठ्या व एका बछड्याची हाडे व कातडी सापडल्याचे पेंच आहेत. काळी जादू करण्यासाठीच वाघांना ठार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान वाघांच्या संरक्षणासाठी विशेष टीम बनवण्यात आले आहेत. वाघांच्या पंजाचा व त्यांच्या मिशांचा उपयोग पैशांचा पाऊस पाडण्यासाठी होतो. असे एका मांत्रिकाने गावकऱ्यांना सांगितल्याने सगळे जण वाघांना ठार करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे अवयव आढळल्याचे सेऊनी यांनी सांगितले.

303 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा