Breaking News

 

 

नांगरगाव, नांगरगाववाडीतील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्याचे प्रयत्न : रोहिणी आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील डोंगरवस्तीत असणाऱ्या नागंरगाव व नांगरगाववाडी येथे पिण्याच्या पाण्याची  टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, आ. प्रकाश आबिटकर, पं. स. सभापती स्नेहल परीट, जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने बोअरवेल मंजूर केली असून तातडीने बोअर मारण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर यांनी दिली.

नांगरगाव (ता. भुदरगड) येथे गावबैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीता सुतार होत्या. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता प्रशांत शिंदे म्हणाले की, पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी नांगरगाव येथे मांगनूर तालावातून पाणीपुरवठा होत आहे. जलस्वराज्य योजनेतून मंजूर झालेल्या या योजना बरीच वर्षे झाली असून 2018-19 च्या राष्ट्रीय पेयजल आराखड्यामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे.

प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले की, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, वनक्षेत्रपाल भुदरगड, भूजल यंत्रणा, जि.प.कोल्हापूर यांच्या समवेत बोअर पुनर्भरण, शाश्वत पाणीसाठ्यासाठी श्रमदान व इतर कार्यक्रम ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या वेळी पं. समिती विस्तार अधिकारी ए. बी. उपाध्ये, ग्रामसेवक कुंभार, ग्रामपंचायत सदस्या आनंदी चव्हाण, लता तानवडे, पोलीस पाटील पांडुरंग मगदूम, भाऊ कृष्णा तानवडे, जोती सुतार, बाळासो पाटील, अक्षय कोदले, विनायक मगदूम, नामदेव मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अशोक तानवडे यांनी आभार मानले.

924 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग