Breaking News

 

 

या निवडणुकीत १९७७ सारखी परिस्थिती होणार : पृथ्वीराज चव्हाण

कराड (प्रतिनिधी) : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत १९७७ सारखी परिस्थिती होणार आहे. नरेंद्र मोदी हे सत्तेपासून दूर जातील. केंद्रात बहुमताचे सरकार न येता त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ते कराड येथील विधानसभा मतदारसंघातील गावांचा आढावा घेतेवेळी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जी स्वप्ने दाखवली होती. यातील कोणतेही स्वप्न पूर्ण झाली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी केलेल्या कामांबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांच्याकडे बोलण्यासारखे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांचा पराभव होणार असल्याची खात्री त्यांना पटली आहे. यामुळे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकाटिपणी करण्यात व्यस्त दिसत आहेत.

देशात कोणत्याही परिस्थितीत भाजप १६०ते १७० पेक्षा अधिक जागा मिळू शकत नाही. त्यांच्याशी युती असणारे अन्य पक्ष ५० जागा मिळतील अशा जास्तीत जास्त २१० ते २२० जागा एनडीएला मिळतील. उर्वरित जागापैकी अपक्ष व अन्य वगळता संयुक्त पुरोगामी आघाडीला मिळतील. यातून संयुक्त पुरोगामी आघाडी केंद्रात सत्ता स्थापन करेल असेही त्यांनी सांगितले.

447 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash