Breaking News

 

 

…मग संघाने मोदींना पंतप्रधान होऊ दिले असते का ? : मायावती 

लखनऊ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय (ओबीसी) म्हणवून घेत आहेत. मात्र, मोदी खरंच ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ? कल्याण सिंह यांच्यासारख्या नेत्याची संघाने काय अवस्था केली, हे संपूर्ण देशाने पाहिले नाही का, असा जळजळीत सवाल ‘बसपा’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. १२ तारखेला उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या जागांसाठी मतदान होईल. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. यावेळी मायावतींनी सपा-बसपची महाआघाडी जातीयवादी असल्याचा नरेंद्र मोदींचा आरोप फेटाळून लावला.

मायावती यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचा हा आरोप अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. जातीयवादाच्या शापामुळे पीडीत असणारे लोक जातीयवादी कसे असू शकतात? मोदी ओबीसी नसल्यामुळे त्यांना कधीही या परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. त्यामुळेच ते काहीही बोलत असल्याची टीकाही मायावती यांनी केली. 

411 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश