Breaking News

 

 

तिरुपती संस्थानकडे ९,२५९ किलो सोने !

तिरुमला (वृत्तसंस्था) : जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान मानले गेलेले आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर (बालाजी) मंदिराकडे तब्बल ९, २५९  किलो सोने आहे. या सोन्याची आज बाजारभावाने किंमत सुमारे ३०४५ कोटी रुपये असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

त्यांनी सांगितले की, विविध बँक आणि मंदिरातील तिजोरीत मंदिराचे सोने जमा आहे. मंदिराचे ५, ३८७ किलो सोने भारतीय स्टेट बँक आणि १९३८  किलो सोने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या गोल्ड डिपॉजिट स्कीममध्ये जमा आहे. पंजाब नॅशनल बँकेने २० एप्रिल रोजी गोल्ड डिपॉजिट स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर १३८१ किलो सोने संस्थानाकडे परत केले आहे. याशिवाय स्वतः संस्थानाकडे ५५३ किलो मिश्रित सोने आहे. यात लहान दागिन्यांचा समावेश आहे.

तिरुपती मंदिरात दररोज २ ते ३ कोटी रूपयांचे दान दिल्या जाते. इंडीय टुडेच्या रिपोर्टनुसार मंदिराला वर्षाला तब्बल ६५० कोटी रूपयांचे दान मिळते. भाविक नगदी, दागिने, सोने-चांदी, संपत्ती आणि डिमॅटचे शेअर देखील दान मध्ये देतात. याशिवाय येथील लाडू प्रसादातून ७५ कोटींची कमाई होते.

येथे केस अर्पण करण्याची प्रथा आहे. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्तगण मंदिरात केस अर्पण करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मंदिरात दररोज एक टनहून अधिक केस गोळा होतात. संस्थान या केसांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विक्री करते. हे केस विग आणि हेअर एक्सटेंशन तयार करण्यासाठी वापरले जातात. संस्थानाला केसांच्या लिलावातून तब्बल ६० लाख डॉलर (४२.०३ कोटी रूपये) मिळतात.

390 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा