Breaking News

 

 

देशातील ५ हजार कोट्यधीशांचे विदेशात स्थलांतर

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी तब्बल ५००० नवकोट नारायणांनी देशाला रामराम ठोकून परदेशात आपले बस्तान बसवल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. कमी ते मध्यम उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशातील कोट्याधीश मोठ्या प्रमाणात देश सोडून विदेशात स्थलांतरित होत आहेत.

या अहवालनुसार सर्वाधिक धनाढ्य लोक देश सोडण्याचे प्रमाण चीनमध्ये आहे. चीनमध्ये मागच्या वर्षी १५,००० श्रीमंतांनी देश सोडला आहे. त्यानंतर या यादीत रशिया, भारत, युके, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील या देशांचा नंबर लागतो. मायदेश सोडणारे सर्वाधिक श्रीमंत ऑस्ट्रेलियात बस्तान बसवत आहेत. गेल्या वर्षभरात जगभरातून १२,००० श्रीमंत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर अमेरिका, कॅनेडा, ग्रीस आणि स्पेन या देशांना पसंती दिली जात आहे. 

भारत आता श्रीमंतांची खाण बनला आहे. त्याचवेळी भारतात आर्थिक विषमताही प्रचंड वाढत आहे. देशातील ४८ टक्के संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात आहे तर उरलेली ५२ टक्के संपत्ती सामान्य लोकांच्या हातात आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जाते आहे.

831 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा