बॉलिवूडचा दबंग होणार बाबा ?

मुंबई (प्रतिनिधी) : सलमान लग्न बंधनात अडकणार नसला तरी त्याने आयुष्यातील फार महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. सलमान, शाहरुख आणि करण जोहर प्रमाणेच सरोगसीद्वारे वडील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे आणि याची आता जोरदार चर्चादेखील सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने लग्न केले नसले तरी तो सरोगसीचा विचार करत आहे. बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर आणि एकता कपूर यांनी सरोगसीद्वारे पालकत्व स्विकारले आहे. सलमान अनेकदा भाचा आणि पुतण्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करताना दिसत असतो. आता सलमान सरोगसीद्वारे स्वत:च्या मुलासोबत खेळण्यासाठी तयार झाला आहे. सध्या सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram