Breaking News

 

 

राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश आज (शुक्रवारी) सायंकाळीपर्यंत येण्याची शक्यता असून त्यानंतरच अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारतील. राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.

सध्या मुख्य सचिवपदी असणारे यु.पी.एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे. यु.पी.एस मदान ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिल्याने अजोय मेहता यांना संधी मिळाली आहे. अन्यथा अजोय मेहता यांना ही संधी मिळाली नसती. कारण अजोय मेहता सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत.

अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदी लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी सध्या या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

312 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे