कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील निमशिरगावच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत २ कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असून, लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निमशिरगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठीची निविदा प्रसिद्ध होईल आणि लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निमशिरगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २.८२ कोटींच्या निधीस मान्यता दिल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.