देशासमोर आता ‘या’मुळेच इंधन दरवाढीचे संकट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे भारतावर आखातातील इतर देशांकडून चढ्या दराने इंधन खरेदी करावे लागणार आहे. परिणामी भारतासमोर इंधन दरवाढीचे संकट घोंगावत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. म्हणणे आहे. तथापि, ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत, त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांतील तेल मिळवण्यासाठी भारत अमेरिकेशी वाटाघाटी करत करत आहे.

इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या हसन रूहानी राजवटीवर विशेषत: इराणी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कच्च्या तेलाबाबत आणि इतरही अनेक निर्बंध लादले होते. यानंतर, आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी इराणवर अवलंबून असलेल्या भारतासह सात देशांना अमेरिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांची सवलत दिली होती.

‘सिग्निफिकंट रिडक्शन एक्झेम्प्शन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या सवलतीची मुदत २ मे रोजी संपली. ज्यांच्याबाबत आधीच करार झाले होते, त्यातील काही तेल अद्याप यायचे आहे. त्यामुळे त्या खेपा येऊ देण्याबाबत आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत आहोत, अमेरिका सरकारशी या संदर्भात चर्चा सुरू असली, तरी अद्याप काही सकारात्मक घडलेले नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

288 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram