Breaking News

 

 

कॅन्सरवर मात करायला ‘तिच्या’कडून प्रेरणा मिळाली ! : सोनाली बेंद्रे

मुंबई (प्रतिनिधी) : कॅन्सरवर मात करायला मला मनीषा कोईरालाने केलेल्या संघर्षातून मिळालेली प्रेरणा कामी आली, अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोनाली बेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर सोनाली विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. एका कार्यक्रमात तिने कॅन्सरशी कसा सामना केला, यावर संवाद साधला.  

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर मी प्रचंड हादरुन गेले होते. मात्र अभिनेत्री मनिषा कोईराला यावेळी माझ्यासाठी मार्गदर्शक ठरली. मनिषाला देखील कर्करोग झाला होता. मात्र यावर तिने यशस्वीरित्या मात केली. तिचाच आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आणि कर्करोगाशी सामना केला. या कालावधीमध्ये ती माझी प्रेरणा ठरली, असे सोनालीने सांगितले

‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या सोनालीने कॅन्सरची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसल्या. मात्र सोनाली या आजाराला खंबीरपणे सामोरी गेली. या आजारपणामध्ये सोनाली कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होती. इतकंच नाही तर तिने सहजरित्या या आजारावर मातदेखील केली.

सोनालीने सांगितले की,  मनिषा कोईरालाला डिसेंबर २०१२ मध्ये गर्भशायाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेली होती. तिथे तिच्यावर जवळपास सहा महिने उपचार चालू होते. कर्करोगावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर मनिषा भारतात परतली होती. या कालावधीमध्ये मनिषाने या आजाराला मोठ्या धीराने सामोरी गेली होती.

783 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा