Breaking News

 

 

नाट्य व्यावसायिकांनी आयुक्तांसमोर वाचला भोसले नाट्यगृहातील अडचणींचा पाढा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील केशवराव भोसले नाट्यगृहात इमारतीसह सर्व सुविधा साधनसामग्री उपलब्ध आहे पण त्याचा वापर नियोजनबद्ध होत नाही. भाडेही न परवडणारे आहे, अशा अडचणींचा पाढा नाट्य व्यावसायिकांनी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचेसमोर वाचला. कलशेट्टी यांनी आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेऊन नाटयगृहात चांगल्या सुधारणा करू अशी ग्वाही दिली. आज (गुरुवार) सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहातील अडचणी जाणून घेण्यासाठी कलशेट्टी यांनी नाटय व्यवसायिकांची बैठक आयोजित केली होती.

कलशेट्टी यांनी प्रथम नाट्यगृह परिसराची पाहणी केली. यामध्ये प्रवेशद्वार, रंगमंच, तिकीट खिडकी, पार्कींग, स्वच्छतागृह, मेकप रूम, पाणी, सांडपाणी याची पाहणी केल्यानंतर बैठकीत उदय कुलकर्णी यांनी बैठकीचा उद्देश विशद केला. यानंतर नाटयगृहाच्या समस्या मांडताना प्रसाद जमदग्नी यानी नाटयगृहाचे १२ ते १५ हजार रूपये भाडे हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्थांना परवडत नाही म्हणून त्यानां ५० % सवलत असे सांगितले. साऊंड सिस्टीम चांगली आहे पण साऊंड ऑपरेटर नाही त्यामुळे प्रयोगाच्या वेळी मोठी अडचण होत असल्याचे सीमा जोशी यांनी सांगीतले. तर मिलिंद अष्टेकर यांनी कायमस्वरूपी स्विपर नेमावा, मोठा आरसा बसवावा, ए.सी. यंत्रणा अपुरी पडते, केशवराव भोसलेंचा पुतळा बसवावा, असे सांगून नाटय व्यवसायीकानी मागण्या सह आरखडा आयुक्तांकडे दिला.

नाट्य वितरक आनंद कुलकर्णी, नरहरी कुलकर्णी, नितिन शिंदे, अजय शिंदे, अवधूत जोशी, प्रेक्षक अशोक जाधव आदीनी समस्या मांडल्या. आयुक्तांंसोबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.

168 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा