Breaking News

 

 

मोदींसारखा भित्रा पंतप्रधान आजवर पाहिला नाही : प्रियांका गांधी

प्रतापगड (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी कायम स्वत:चा मोठेपणा सांगतात. ते स्वत: धाडसी म्हणवून घेतात. मात्र त्यांच्यासारखा दुबळा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही. राजकीय शक्ती ही फक्त प्रचाराने येत नाही की टीव्हीवर कायम दिसत राहिल्याने येत नाही अशी टीका उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. त्या आज (गुरुवार) पूर्व उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील प्रचारसभेत बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका कॉंग्रेसच्या जिव्हारी लागलीय. मोदी सध्या सातत्याने राजीव गांधी यांना टार्गेट करताहेत. बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरण आणि INS विराटचा राजीव गांधी यांनी सुट्टीसाठी वापर केला असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. या सगळ्या आरोपांनी चिडलेल्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना धारेवर धरलं. प्रियंका म्हणाल्या की, नरेंद्र मोदी कायम स्वत:चा मोठेपणा सांगतात. ते स्वत: धाडसी म्हणवून घेतात. मात्र त्यांच्यासारखा दुबळा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही.

सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे राहिले असून १२ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात 7 राज्यांमधल्या ५९ जागांसाठी मतदान होत आहे. यात दिल्लीतल्या सर्व 7 जागांचाही समावेश आहे.

180 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे