कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचे धडे देणारी ‘ऑरडिनो प्रोजेक्ट’ वर आधारित कार्यशाळा घेण्यात आली. सध्याच्या युगात विकसित होत असलेली नवनवीन तंत्रप्रणाली विक विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यशाळेत ऑरडिनोचा वापर करून नवनवीन प्रोजेक्टस कसे बनवता येतात,  त्यासाठी लागणारे कोडिंग याचे प्रात्यक्षीक दाखवण्यात आले. २ ते ६ नोव्हेंबरपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्याहस्ते झाले.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आदींचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यशाळेच्या समन्वयक मनिषा भानुसे व विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी समन्वयक म्हणून रितेश मेरवडे आणि निखिल घोलकर यांनी काम पाहिले