Breaking News

 

 

जयंती गोपाळ कृष्ण गोखलेंची, फोटो वापरला टिळकांचा… : ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा ‘प्रताप !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीश सरकारविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे,  काँग्रेसचे आघाडीचे नेते, भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक आणि म. गांधी यांचे गुरु मानले जाणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची आज (गुरुवार) जयंती. गोखले यांना आदरांजली वाहताना काँग्रेसचे नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी फेसबुकवर चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे, तर नेटकऱ्यांनी त्यांना यावरून ट्रोल केले आहे.

रावत यांनी आपल्या फेसबुक पेजवर टिळकांचा फोटो वापरुन पोस्ट केली आहे. त्यामध्ये ‘महान स्वतंत्रता संग्राम सेनानी, शिक्षाविदी, समाजसुधारक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त शत शत नमन तसेच विनम्र श्रद्धांजली’, असा मजकूर या फोटोवर लिहिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी #GopalKrishnaGokhale हा हॅशटॅगही वापरला आहे. मात्र ज्या फोटोवर गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे तो फोटो लोकमान्य टिळकांचा आहे. रावत यांच्या ज्येष्ठ नेत्याकडून असा प्रकार घडल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. प्रथम आपल्याच पक्षाचे नेते ओळखा आणि मग आदरांजली वाहा, असा सल्ला देण्यात आला आहे.

273 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग