Breaking News

 

 

दीदींची थप्पड माझ्यासाठी आशीर्वादच ! : पंतप्रधान

पुरुलिया (वृत्तसंस्था) : ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहे, असे म्हणत चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती तर बरं झालं असतं. त्यांना इतकं घाबरावं लागलं नसतं, अशा शब्दात मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते, असं वक्तव्य करणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. ते आज (गुरुवार) पश्चिम बंगालमधील पुरूलिया येथे प्रचारसभेत बोलत होते.

जय श्रीराम, जय मां काली, जय मां दुर्गा असा जयघोष करणाऱ्यांवर ममता बॅनर्जी संतापतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली जाते, असे मोदींनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या चौकटीत राहून काम करत नाही, भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांची प. बंगालमध्ये हत्या करण्यात आली. पण दिल्लीतील प्रसारमाध्यमं आणि काँग्रेस नेते गप्प आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

258 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश