Breaking News

 

 

कोल्हापुरात शुक्रवारपासून जेसुइट माजी विद्यार्थ्यांचे संमेलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंट झेवीयर्स माजी विद्यार्थी असोसिएशन व  सेंट झेवीयर्स स्कूल यांच्या विद्यमाने कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियनच्या सभाग्रहात शुक्रवार दि. १० ते १२ रोजी जेसुइट माजी विद्यार्थ्यांचे पश्‍चिम विभागीय संमेलनाचे आयोजित करण्यात आल्याची माहिती आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत प्रविण सोलंकी, बाबाप्रसाद लंका यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, शुक्रवार दि. १० रोजी संमेलनाचे स्वागत व उद्घाटन अँड्रयू फरनांडीस यांच्या हस्ते करून पर्यावरणाविषयी चर्चा केली जाणार आहे. शनिवार दि. ११ रोजी सकाळी ९.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘पर्यावरण जागरूकता’ ह्या मुख्य विषय डॉ. मेधा कुमठेकर, प्रा.नीलकंठ शिंदे, अंजली जाधव आदी मान्यवर विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधणार आहेत. रविवार दि. १२ रोजी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून नवीन स्थळांना भेट देण्यात येणार आहे.

या संमेलनास मुंबई, गोवा, गुजरात, पुणे येथील जेसुइट सोसायटीच्या पश्‍चिम विभागीय संस्थेमधील ४१ संस्था प्रतिनिधी मुख्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी फादर मुख्याध्यापक जेमस थोरात, जितेंद्र बामणे, प्रसाद गवस, अँथोनी डिसोझा, रुजाई उपस्थित होते.

546 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा