वर्षा उसगावकर, समृद्धी पोरे, तारा भवाळकर, रेणूताई गावस्कर, मनीषा साळुंखे यांना ‘भगिनी पुरस्कार’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. राजेश क्षीरसागर फौंडेशन संचलित भगिनी मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ‘भगिनी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार दि. १० ते १२ मे या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. यंदाचा ‘भगिनी पुरस्कार’ अभिनेत्री वर्षा उसगावकर, दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, लेखिका तारा भवाळकर आणि आंतरराष्ट्रीय धावपटू मनीषा साळुंखे यांना देण्यात येणार असल्याची माहिती भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यानी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

भगिनी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगून क्षीरसागर म्हणाल्या की, या महोत्सवात २५० महिला बचत गटांना मोफत विक्री स्टॉल देण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मेघा घाडगे आणि श्रुती मराठे यांची लावणीची जुगलबंदी असलेला ‘रंगबाजी’ हा खास महिलांसाठी कार्यक्रम, मिस आणि मिसेस भगिनी २०१९ सौंदर्य स्पर्धा, गायन, विनोद आणि नृत्याचा ‘धुमधडाका’ हा करमणुकीचा कार्यक्रम, झिम्मा- फुगडी स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्पर्धकांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत.

भगिनी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार १० मे रोजी स. ११ वाजता महापौर सरिता मोरे यांचे हस्ते, राज्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवार १२ मे रोजी सांगता समारंभ छ. शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर सरिता मोरे यांच्या उपस्थितीत होणार असून या वेळी भगिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ११ हजार रु. रोख, मानपत्र, भगवा फेटा, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी आ. राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, रविकिरण इंगवले उपस्थित होते.

258 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram