Breaking News

 

 

बदनामीच्या खटल्यातून जयराम रमेश यांना जामीन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कारवाँ’ मासिकातील बदनामीकारक लेखाचा दाखला दिल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र विवेक डोवल यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना दिल्लीतील कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात कारवाँ मासिकाच्या संपादकाला आणि एका रिपोर्टरलाही यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘कारवाँ’ मासिकात कौशल श्रॉफ यांनी विवेक डोवल यांच्यावर आरोप करणारा लेख लिहिला होता. मात्र, या लेखातील माहिती निराधार असल्याचा दावा विवेक डोवाल यांनी केला होता. त्यामुळे कारवाँ मासिक, कौशल श्रॉफ, जयराम रमेश यांच्या विरोधात विवेक डोवल यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता.

कारवाँ नियतकालिकातील दी डी कंपनीज या लेखात विवेक डोवाल यांच्यावर आरोप करताना २०१६ मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर काही दिवसांत विवेक डोवाल यांनी केमन बेटांवर मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ झाल्याचा दावा यात करण्यात आला होता.

रमेश यांनी रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली होती की, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान केमन बेटांवरुन आलेल्या ८३०० कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीचा उल्लेख ‘कारवाँ’ मासिकेत करण्यात आला आहे. या गुंतवणुकीची माहिती सार्वजनिक करायला हवी. तसेच याची संपूर्ण चौकशीही करावी असेही त्यांनी यावेळी मागणी केली होती.

300 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा